त्झात्झीकी सॉस – Tzatziki sauce

Tzatziki Sauce in English

वेळ: ५ ते ७ मिनिटे
१  कप सॉस (४ जणांसाठी)

साहित्य:
१ मोठी काकडी, सोलून, बिया काढून टाकाव्यात आणि मध्यम तुकडे करावेत
दीड कप दही (शक्यतो फुल फॅट) (टीप)
२ लसणीच्या पाकळ्या, बारीक चिरून
१ टेस्पून फ्रेश डील (किंवा १ टीस्पून ड्राईड डील) (टीप)
१ टेस्पून ऑलिव्ह ऑईल
१ टेस्पून लिंबाचा रस
चवीपुरते मीठ

कृती:
१) दही १ तासभर टांगून ठेवावे. जेणेकरून दही थोडेसे घट्ट होईल.
२) टांगलेले दही, लसूण, डील, ऑलिव्ह ऑईल, लिंबाचा रस, आणि मीठ ब्लेंडरमध्ये घालून ब्लेंड करावे. नंतर काकडीचे तुकडे घालून भरडसर ब्लेंड करावे.

तयार त्झात्झीकी सॉस फलाफल बरोबर सर्व्ह करावा.

टिप्स:
१) पारंपारिक पद्धतीनुसार त्झात्झीकी सॉस ग्रीक योगर्ट (मध्यमसर घट्ट चक्का) पासून बनवतात. जर ग्रीक योगर्ट असेल तर ते तसेच डायरेक्ट वापरावे. नसल्यास दही थोडावेळ टांगून मग वापरावे.
२) डीलऐवजी पुदिन्याची पानेही वापरू शकतो.
३) लिंबाचा रस नसल्यास थोडेसे व्हिनेगर वापरले तरीही चालेल.

व्हाईट सॉस – White Sauce

White Sauce in English

वेळ: १० मिनिटे
साधारण १ कप व्हाईट सॉस

साहित्य:
२ टेस्पून बटर
३ टेस्पून मैदा
दीड कप गरम दूध
२ चिमटी मीठ
१ टीस्पून साखर

कृती:
१) पॅनमध्ये बटर गरम करावे. बटर वितळले कि मैदा घालून मध्यम आचेवर एक-दोन मिनिटे परतावे. सतत परत राहा. परतायचे थांबल्यास मैदा जळेल. मैद्याचा रंग हलका गुलाबी आला पाहिजे. जास्त गडद रंग आल्यास सॉसचाही रंग बदलेल.
२) मैदा परतल्यावर त्यात गरम दुध घालून ढवळावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. सॉस दाट होईतोवर ढवळावे.
३) मीठ आणि साखर घालून मिक्स करावे. गॅस बंद करून व्हाईट सॉस लगेच वापरावा.